ध्यास विश्वसार्ह बातमीचा

याला सरकार चालवणे म्हणतात का? ; राज ठाकरेंचा हल्लाबोल

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असल्याने पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यासाठी निघाले असतांना त्यांनी आज पुणे येथे पाहणी केली असता सत्ताधारयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, राज्याला दोन उपमुख्यमंत्री असले तरी लक्ष कुणाचेच नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर हे सर्व मिळून दिसली जमीन की विक, असाच कार्यक्रम सध्या चालू आहे. पुणे शहर हे एक शहर राहिले नाही तर ते पाच शहरे झाली आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर परिस्थितीतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून केंद्र सरकार राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. त्यामुळे सध्या राज्यातील महानगरपालिकांना नगरसेवक नाहीत. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणार कोण? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सध्या सुरू असलेला कारभार पाहता ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

या राज्यात बाहेरून येणाऱ्या, परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना तुम्ही मोफत घरे वाटत आहात. आणि या राज्यात राहणारे नागरिक सध्या भिक मागत आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. याला सरकार चालवणे म्हणतात का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य म्हणून महाराष्ट्रावर कोणाचे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. देशात प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करत आहे. मात्र, देशात महाराष्ट्राच्या विचार करणारे कोणी आहे का? असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!