नाशिक : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झालेल्या सभेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, लोकसभेला जो झटका दिला तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांसमोर चुकीची कबूल दिली आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ केले, असे निर्णय घेतले असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही. असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.
मी उगाचच गुलाबी गाडीत फिरत नाही किंवा गुलाबी स्वप्न दाखवत नाही. हा अजितदादा यांचा वाद आहे. स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद माझ्यामध्ये आहे, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. महिला आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करत असतात. अशा महिलांच्या अडचणीत मदत म्हणून लाडकी बहिण योजनेचा निर्णय घेतला आहे. मात्र ही योजना बंद करू अशा पद्धतीचा नरेटिव्ह पसरवला जात आहे. या नरेटिव्हला बळी पडू नका. ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी सुरू केली आहे. कोणतीही योजना सुरू करताना ती बंद करण्यासाठी सुरू करता येत नाही, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमच्या चिन्ह समोरील बटन दाबले पाहिजे, असे आवाहन देखील अजित पवार यांनी उपस्थित महिलांना केले.
आज नागपंचमीचा सण आहे. आपण नागाची पूजा करतो. आज आदिवासी दिन देखील आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. महात्मा गांधी यांनी चले जावो ही घोषणा देखील आजच्या दिवशी दिली होती. स्वातंत्र लढ्यात अनेकांनी बलिदान दिले होते. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली योजना आणली आहे. मित्र पक्षांचे देखील त्याला सहकार्य लाभले आहे. आम्ही महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आहे. त्यांना सक्षम केल्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.