---Advertisement---

पुणे – सोलापूर महामार्गावरील धावत्या बसने घेतला अचानक पेट

By team
On: August 9, 2024 3:46 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसला अचानक आग लागल्याची थरारक घटना हवेली तालुक्यातील पुणे – सोलापूर मार्गावर घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. पण संपूर्ण बस भस्मसात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलपुढे शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमरास ही घटना घडली. या बसमधून 17 प्रवाशी प्रवास करत होते. ही बस हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येत होती. अचानक बसधून धूर निघत असल्याची बाब प्रवाशांच्या लक्षात आली. हे पाहून त्यांनी एकच आरडाआरोडा सुरू केला. यामुळे चालकाने तत्काळ बस बाजूला घेत थांबवली. त्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात संपूर्ण बस भस्मसात झाली. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बसचे टायर फुटल्यानंतर झालेल्या घर्षणामुळे ही आग लागली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!