---Advertisement---

चक्क महिला खासदाराचा फोन हॅक ; राजकीय वर्तुळात खळबळ

By team
On: August 11, 2024 2:46 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅप, ई-मेल, फोन हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खातीही हॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका खासदाराचा फोन हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. तसेच सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन आज दुपारी 1 च्या सुमारास एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे सांगितले. “अत्यंत महत्वाचे – माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!