ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाड्यासह विदर्भात पाऊस राहणार कायम

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने मोठी उघडीप घेतली असली तरी विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. आजही विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा याला अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून पुढे उत्तरेकडील भागावर 1004 व दक्षिणेकडील भागावर 1006 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्याचा थेट परिणाम पावसाच्या प्रमाणावर होऊन काही काळ उघडीप, तर हलक्या पावसाची शक्यता राहील.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिकमध्ये आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे. तर आज आणि उद्या बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर, हिंगोली जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव, लातूर व जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांत या आठवड्यात पावसात उघडीप राहणे शक्य आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मध्यम स्वरूपात राहील.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 14 ते 22 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘ला-निना’च्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्याचे तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे विषुववृत्तीय भागातील तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. त्याचाही फायदा पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!