ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नामांकित कंपनीत कर्मचाऱ्यांना नारळ : देशात पुन्हा बेरोजगारी वाढणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षात जगभरात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्यांच्या टाळेबंदीचे संकट ओढवले होते. विशेषतः आयटी क्षेत्रातील लाखो कर्मचारी बेरोजगार झाले ज्यामुळे जगावर पुन्हा एकदा मंदीचे संकट ओढवले आहे की काय अशी चर्चा सुरू झाली.

भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला देखील ही संभाव्य मंदी अपवाद ठरली नाही. देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसुमारे ने गेल्या आर्थिक वर्षात 42 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 11 टक्के कर्मचारी कमी केले असून खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. रिटेल क्षेत्रातील घसरणीमुळे कंपनीला नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे अहवालात सांगण्यात येत असून संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने कोणतीही नवीन भरतीही केली नाही. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीची अनेक दुकाने बंद राहिल्याने त्यांचा विस्तार कमी झाल्याचे यामागचे कारण सांगितले जात आहे.

एका अहवालानुसार 2022-23 या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एकूण 3.89 लाख कर्मचारी होते तर 2023-24 आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या 3.47 लाखापर्यंत कमी झाली. रिलायन्सने अलीकडेच सादर केलेल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. कंपनीने म्हटले की आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नवीन भरती एक तृतीयांशपेक्षा कमी झाली आणि फक्त 1.70 लाख ठेवली गेली. आघाडीच्या ब्रोकिंग फर्मचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की रिलायन्सचे अनेक व्यवसाय पूर्णपणे परिपक्व झाले असून याला डिजिटल उपक्रमांचाही मोठा पाठिंबा मिळाला आहे. कंपनीचे सर्व व्यवसाय शिखरावर पोहोचले आहेत. ब्रोकिंग फर्मने सांगितले की, कंपनीने खर्च कमी करण्यासाठी नोकऱ्या कमी केल्या असून रिटेल क्षेत्रात सर्वाधिक टाळेबंदी केली. 2022-23 या आर्थिक वर्षात रिटेल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या 2.45 लाख होती जी 2023-24 या आर्थिक वर्षात 2.7 लाखपर्यंत कमी झाली आहे. याशिवाय, 2022-23 या आर्थिक वर्षात रिलायन्स जिओमधील कर्मचाऱ्यांची संख्या 95 हजार होती, जी 90 हजारांवर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!