ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार ; मलाही अडकवण्याचा प्रयत्न झाला !

मुंबई : वृत्तसंस्था

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तसा आदेश दिला होता, असा आणखी एक खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला होता. यावर देखील एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हे तर विरोधी पक्षात होते. मात्र मी त्यांच्या पक्षात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी होतो. विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला केला हे आपण समजू शकतो. त्यांच्यावर खोट्या केस दाखल करणे समजू शकतो. मी तर त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. तरी देखील माझ्या बाबतीत अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला, ही वस्तुस्थिती असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

मुगल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते. तसेच उद्धव ठाकरे यांना मी दिसतो. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला, हे अजून त्यांना पचलेले नाही. त्यामुळे त्यांना बसता-उठता, खाता-पिता सर्वत्र मी दिसतो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सरकार पडेल, सरकार पडेल असे ते सुरुवातीपासून सांगत होते. मात्र दोन वर्षांपासून सरकार व्यवस्थित सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असल्याचा टीका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाडकी बहिण योजनेवर तसेच सरकारवर ते टीका करतात. आणि त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी या योजनेचे बॅनर लावतात. तसेच या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी प्रयत्न करतात. ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!