---Advertisement---

‘मुख्यमंत्री साहेब, अद्याप विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही ; पवारांनी उडविली खिल्ली

By team
On: August 14, 2024 10:04 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निडणूकीसाठी सर्वच पक्ष तयारी असतांना विरोधक सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल करीत असतांना नेहमीच दिसत असतांना नुकतेच शरद पवार गटाचे आ.रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 15 ऑगस्ट आला तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खिल्ली उडवली असल्याची आठवण देखील रोहित पवार यांनी करुन दिली.

या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण, अजित दादा, फडणवीस साहेब, शंभूराज देसाई सर्वांनी मिळून “रोहितला गणवेश शिवून द्या” म्हणून खिल्ली उडवली होती. मात्र, आमदारांनी अधिवेशनात मांडलेले विषय हे serious घ्यायचे असतात, असे म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांची पोस्ट वाचा….
‘मुख्यमंत्री साहेब, गणवेश वेळेत मिळणार नाहीत तसंच गुजरातमधून आणत असलेल्या ‘पॉलिस्टर-विस्कोस’ ऐवजी महाराष्ट्राचेच कॉटन चे गणवेश विद्यार्थ्यांना द्या” म्हणून मी अधिवेशनात आपल्याला जाब विचारला असता आपण, अजित दादा, फडणवीस साहेब, शंभूराज देसाई सर्वांनी मिळून “रोहितला गणवेश शिवून द्या” म्हणून खिल्ली उडवली होती. साहेब, सभागृहात मांडले जाणारे मुद्दे serious घ्यायचे असतात, परंतु हे दुर्दैव. 15 ऑगस्ट आला तरी तुमचे गणवेश विद्यार्थ्याना मिळालेले नाहीत. तुम्हाला जाब विचारणाऱ्या एका आमदारापर्यंत तुमचा गणवेश पोहचला नाही तर विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचणार ? मला गणवेश शिवून देण्याची भाषा करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देण्यावर भर दिला असता तर अधिक बरं झालं असतं. किमान आता तरी #serious होऊन कर्तुत्व दाखवा.’

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!