ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भितीपत्रके साकारावीत ; शांभवी कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त भित्तिपत्रकाचे प्रकाशन

अक्कलकोट : प्रतिनिधी

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल मधील युट्युब, व्हाट्सअप, फेसबुक ही ज्ञान स्तोत्रे झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्याकडे दुर्लक्ष झाले आहे. म्हणून शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भित्तिपत्रके साकारावीत असे प्रतिपादन शांभवी कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक शास्त्रे, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, साहित्यिक मुकुंद पत्की, पुनम कोकळगी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी,बापूजी निंबाळकर, खंडेराव घाटगे उपस्थित होते.

साहित्यिक मुकुंद पत्की म्हणाले की, विद्यार्थ्यांकडे अंगभूत कौशल्य असतात. त्यांचा विकास करण्याची संधी महाविद्यालयात मिळत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालयाच्या उपक्रमात सहभाग घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भीम सोनकांबळे यांनी केले. आभार मनीषा शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ बाळासाहेब पाटील, प्रा राजेश पवार, डॉ शितल भस्मे, प्रा तुकाराम शिंदे, प्रा शितल धूमशेट्टी, प्रा विद्याश्री वाले, प्रा विद्या बिराजदार, प्रा जनाबाई चौधरी, प्रा शितल फुटाणे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागाच्या वतीने विवेक भित्तिपत्रक, विज्ञान विभागाचे अग्निपंख तर वाणिज्य विभागाचे अर्थ मंथन या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या भितीपत्रकाचे संपादक प्रा भीम सोनकांबळे, प्रा मनीषा शिंदे, प्रा शितल फुटाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!