अक्कलकोट : प्रतिनिधी
भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला प्रशाला व श्री. गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन दुधनी नगर परिषदेचे माजी नगरसेवक गुरुशांत परमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि.प्र.डॉ. शांतलिंगेश्र्वर महास्वामीजींच्या अमृतहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, सचिव प्रथमेश म्हेत्रे, सहसचिव महादेव खेड, मठाचे धरमदर्शी सिध्दाराम येगदी, सिद्धराम मल्लाड, गुरुशांत ढंगे, गुरुपदप्पा कुंभार, संजय मंथा, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकप्पा बुरुड, उपाध्यक्ष गणेश ओनमशेट्टी, गुलाब खैराट, चंद्रकांत वागदरी, महादेव कोटनुर, सिद्धप्पा झळकी, शिवानंद येगदी, प्राचार्य सिद्धाराम पाटील, उपप्राचार्य देसाई , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यानंतर श्री.म.नि.प्र. डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्यसानिध्यात बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे होते.
यावेळी प्रशाला व कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याद्वारे सन्मान करण्यात आले. तसेच फेब्रुवारी / मार्च 2023 दहावी/बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांकना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. डॉ. शांतलिंग महास्वामीजींच्या संकल्पनेनुसार यावर्षापासून दरवर्षी 11 वीत प्रथम, द्वितीय गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश ठेवण्यात आले होते त्यानुसार परमपूज्य श्री. म.नि.प्र.लिं.महालिंग महस्वामीजी यांच्या कृपापोशित (कन्नड) कला शाखेतील प्रथम, द्वितीय विद्यार्थांना सन्मान करण्यात आले. श्री.म.नि.प्र.गुरुशांतलिंगेश्र्वर महास्वामीजी यांच्या कृपापोषित विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय विद्यार्थांना सन्मान करण्यात आले आणि स्व.सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे यांच्या स्मरणार्थ (मराठी) कला शाखेतील प्रथम द्वितीय विद्यार्थांना सन्मान करण्यात आले. त्याचबरोबर तालुकास्तरीय 17 वयोगटातील कबड्डी स्पर्धेत दुसरे क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. बक्षीस वितरणानंतर विद्यार्थ्याकडून देशभक्तीपर विविध नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राम गद्दी, शरणगौडा पाटील, एकनाथ मोसलगी सुनील अडवितोटे, बसवराज बंद्राड, राजशेखर बिराजदार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी करडे तर आभार महारुद्र शेंडे यांनी केले.