---Advertisement---

शरद पवारांनी कसली कंबर : भाजपला दिला धक्का

By team
On: August 27, 2024 3:22 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. अशातच शरद पवारांनी या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसतं आहे. शरद पवार सध्या विविध भागाचे दौरे करत आहेत. अशात भाजपचे नेते त्यांच्या भेटी घेत आहेत. तर काहीजण लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं कळतंय. अशातच आता अहमदनगरमधील बडा नेता देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार, भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विवेक कोल्हे हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. यावेळी कोपरगाव विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आणि उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार भाजपला धक्का देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं कळतं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहेत. यावेळी शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

विवेक कोल्हे हे कोपरगावमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्रअजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झालीय. विवेक कोल्हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी मतदारसंघात अनेक दिवसांपासून चर्चा आहे. कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगाव विधानसभा मतदारमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!