---Advertisement---

पंतप्रधान मोदींचे सिंगापूरात जंगी स्वागत ; मोदींनी वाजवला ढोल

By team
On: September 4, 2024 3:37 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी  2 दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर पोहोचले असून येथे भारतीय समाजातील लोकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पीएम मोदींनी ढोलही वाजवला. लोकांनी पीएम मोदींना भगव्या रंगाचा गमछा भेट दिला. सिंगापूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार, त्या हॉटेलच्या बाहेरही त्यांच्या स्वागतासाठी भारतीय समाजातील लोक उपस्थित होते.

लोकांनी पीएम मोदींसोबत सेल्फीही काढले. यावेळी एका महिलेने त्यांना राखीही बांधली. सिंगापूर दौऱ्यात ते राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. सिंगापूरमधील व्यापारी समुदायाच्या नेत्यांनाही पंतप्रधान भेटणार आहेत.

याआधी बुधवारी पंतप्रधानांनी ब्रुनेईचा सुलतान बोलकिया यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीनंतर भारत आणि ब्रुनेई यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आले. बंदर सेरी बेगवान आणि चेन्नई दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. याशिवाय दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. यावेळी त्यांनी आसियान देशांच्या विकासासाठी काम करण्याचे मान्य केले. ब्रुनेईच्या सुलतानने जगातील सर्वात मोठ्या पॅलेस ‘इस्ताना नुरुल इमान’ येथे पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

पीएम मोदी म्हणाले, “ब्रुनेईमध्ये माझे स्वागत करण्यात आले, त्यासाठी मी राजघराण्याचे आभार मानतो. भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईला झालेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. येथे जाणवलेल्या परिचयामुळे मला दोन्ही देशांमधील शतकानुशतके जुन्या संबंधांची मला जाणीव करून दिली. भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनमध्ये ब्रुनेई एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. भारताने नेहमीच आसियान देशांमध्ये शांततेला प्राधान्य दिले आहे.” चीनचे नाव न घेता, पीएम मोदी म्हणाले, “आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नेव्हिगेशन आणि ओव्हरफ्लाइटच्या स्वातंत्र्याचे समर्थन करतो. भारत हा विस्तारवादाचा नसून विकासाचा समर्थक आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!