---Advertisement---

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला सन्मान

By team
On: September 5, 2024 3:36 PM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर :  वृत्तसंस्था

मौजे तळवेस ता.उदगीर जि. लातूर येथील परिसरात उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुध्द विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिनांक ४ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लातूर जिल्ह्यात आल्या होत्या.

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लातूरचे सुपुत्र तथा अध्यक्ष नाथ संस्थान औसा जि लातूर तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची मुर्ती व उपरणे देऊन सन्मान केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचाही सन्मान यावेळी औसेकर महाराज यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!