---Advertisement---

अजित पवारांचे मोठ वक्तव्य : मुख्यमंत्री पदाबाबत केले भाष्य !

By team
On: September 6, 2024 10:33 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई  : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असतांना गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये ‘मुख्यमंत्री’पदासाठी आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठ वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री पदासाठी कोणता चेहरापुढे करत महायुती निवडणूक लढवणार नाही. तीनही पक्षांचे (शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी) प्राथमिक लक्ष्य बहुमताचा आकडा गाठणे आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचार करता येईल. मात्र मुख्यमंत्री महायुतीचा नक्कीच असेल. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीकडे मुख्यमंत्री चेहरा असेल का, असा प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी हे उत्तर दिल्याने चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाही. म्हणजे अशा गोष्टींबद्दल आपण इतक्या लवकर निर्णय कसा घेऊ शकतो? अशा गोष्टी अगोदर ठरवल्या जात नाहीत. अनेक गोष्टींचा आधी विचार करावा लागतो,असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू न शकल्याने त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अजित पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मुख्यमंत्रिपदावरून वादाच्या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या आणि इतर अनेक आरोपांनाही उत्तर दिले

अजित पवार म्हणाले की, बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चांवरही अजित पवार यांनी महत्वाचा खुलासा केला. मी निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले नाही. जयने बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेल्या मागण्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी ही लोकशाही आहे, अशा मागण्या करता येतात आणि मी तिथून सात-आठ वेळा आमदार झालो आहे, असे उत्तर दिले होते. यावरुनच मी लढणार नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र कोण कुठून निवडणूक लढवणार हे पक्ष ठरवणार आहे, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!