ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात ‘महालक्ष्मी योजना’ आणू ; कॉंग्रेस नेत्यांचे सरकारवर टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या महिन्यात राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहिण योजना राबविली असून त्यानंतर या योजनेवर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते आता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले असून कॉंग्रेस देखील कामाला लागले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

लाडकी बहीन योजनेवरुन राज्य सरकार इव्हेंट करत आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून लूट चालू असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे. मात्र, भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहित आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. महालक्ष्मी योजनेच्या नावाने ही योजना आणणार असून त्यामध्ये मात्र महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच त्यात दर व्रषी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने या योजनेवर टीका करण्यात येत आहे. त्यात आता नाना पटोले यांनी यापेक्षाही चांगली योजना आणण्याची घोषणा केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वतीने या नव्या योजनेची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर आमच्या सरकारच्या या योजनेमध्ये दरवर्षी एक हजार रुपयांची वाढ करणार असल्याची घोषणा देखील नाना पटोले यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!