---Advertisement---

राज्यातील ‘या’ प्रवाशांना असेल बसमध्ये आसन रिक्त !

By team
On: September 6, 2024 3:58 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या वर्षी बसमध्ये प्रवास करण्यासाठी महिलांना मोठी सूट सरकारने दिली होती. आता दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एस टी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. ज्यावेळी बसमध्ये ‍दिव्यांग प्रवासी प्रवास करित नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल.

तसेच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य दयावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!