---Advertisement---

…छाटू नका, तिला केवळ चटके द्या ; भाजपच्या नेत्यांचे वादग्रस्त विधान

By team
On: September 18, 2024 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापूर्वी आरक्षणाच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केले होते. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते त्यानंतर आता भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

खासदार अनिल बोंडे म्हणाले कि, आरक्षणाच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तिला केवळ चटके द्या, असे वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर आता भाजप खासदार बोंडे यांनी असे विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या मुद्यावर कथित वादग्रस्त विधान केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली आहे.

अनिल बोंडे म्हणाले की, आमदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही. पण राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेले विधान अतिशय भयानक आहे. कुणी परदेशात जाऊन असे वात्रटासारखे बोलत असेल तर त्याची जीभ छाटू नये, तर त्याच्या जिभेला चटके द्यावेत. अशा लोकांच्या जिभेला चटके देण्याची फार गरज असते.

अनिल बोंडे यांनी यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव व अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते श्याम मानव यांच्यावरही निशाणा साधला. भारतातील बहुसंख्यकांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना किमान त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके निश्चितपणे दिले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!