---Advertisement---

खळबळजनक : पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून 23 जणांना विषबाधा

By team
On: September 21, 2024 3:51 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पितृपक्षाचे कार्यक्रम जोरदार सुरु असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी या गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून 23 जणांना विषबाधा झाली. या सर्वांवर धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी दिली.

केज तालुक्यातील उंदरी येथे 20 सप्टेंबर रोजी भागवत ठोंबरे परिवारात पितृपक्षाचा कार्यक्रमा निमित्त जेवणाचा कार्यक्रम दुपारच्या वेळेमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जेवणातून संध्याकाळी 23 जणांना उलटी, सौचाचा सर्वांनाच त्रास सुरू झाला. हे सर्वजण या ठिकाणी जेवणासाठी आल्‍याने याच जेवणातूनच या सर्वांना विषबाधा झाली. त्यांना लागलीच 21 सप्टेंबर शनिवारच्या पहाटे तीन वाजता धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिक्षक डॉ. शशांक वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. गोरख मोरे, डॉ. विजयकुमार सूळ, डॉ. परवेज शेख, डॉ. दत्तात्रय जाधव यांनी रुग्णांवर उपचार केले. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली. तसेच कशातून विषबाधा झाली हे तपासण्यासाठी नमुने घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!