अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यासाठी असलेल्या उत्तर आणि दक्षिण पोलीस स्टेशन यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही इमारती ह्या अतिशय जुनाट आणि जीर्ण झालेल्या आहेत. त्या दोन्हींच्या एकत्रित नवीन बांधकामास १० कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याने कित्येक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली
निघाला आहे, अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर असल्याने अक्कलकोट तालुका हा सतत नेहमी वर्दळीचा आणि संवेदनशील तालुका असल्याने या ठिकाणी पोलिसांचा कार्यभार मोठा आहे.यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज असे नवीन इमारत फर्निचर सह असणे अत्यंत आवश्यक होते. नेमकी हीच गरजेची बाब ओळखून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गृह विभाग आणि पोलीस कल्याण विभाग यांच्याकडे सतत पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणल्याने हा प्रश्न निकाली निघाला आहे. थोड्याच दिवसात सुधारित अंदाजपत्रक आणि निविद्याची प्रक्रिया पूर्ण करून इमारत बांधकामात सुरू होणार आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील सुमारे १४० च्या आसपास असलेले सर्व गावे या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनावर असणाऱ्या कामाचा ताण कमी होऊन त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करणे सोपे जावे यासाठी सदर इमारतीच्या बांधकामास निधीची मंजुरी मिळणे आवश्यक होते तो प्रश्न आता पूर्णत्वास जात आहे. या नव्याने बांधकाम निधी मंजूर झालेल्या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत दोन्ही पोलीस स्टेशनच्या एकत्रित बांधकामासाठी फर्निचरसह हा निधी मंजूर झाला आहे ज्यात तळमजला आणि वर दोन मजले अशी भव्य दिव्य तीन मजली इमारत बांधली जाणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या २८ हजार ४०० चौरस फूट जागेपैकी १८ हजार ९० चौरस फूट जागेत बांधकाम होणार आहे.सदर प्रकल्पाची निविदा अंतिम करून काम सुरु होणे बाकी आहे.
सुसज्ज इमारती होणार
अक्कलकोट शहरातील दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारती या संस्थांकालीन आहेत. त्या खूपच जीर्ण झाल्याने वाढत्या कार्यभाराला अनुरूप असे कामकाज करणे अडचणीचे ठरत होते. सर्वच शासकीय कार्यालयाच्या इमारती या सर्व सुख सोयीने सुसज्ज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या असाव्यात यासाठी सतत पाठपुरावा करून दहा कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करून आणला आहे.
– सचिन कल्याणशेट्टी, आमदार