---Advertisement---

कांदा विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवर काळाचा घाला ; भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू, एक जखमी

On: December 16, 2020 4:54 PM
Follow Us:
---Advertisement---

आराधवाडी : कांदा घेऊन सोलापूरकडे निघालेल्या नेकनूर (ता.केज, जि. बीड) येथील शेतकऱ्यांवर काळाचा घाला पडला आहे. आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे सोलापूर – उस्मानाबाद मार्गावरील आराधवाडी(ता.तुळजापूर) नजीक घडलीय.

 

याबाबत थोडक्यात असे की,  नेकनूर (ता.केज, जि. बीड) येथील शेतकरी आज भल्या पहाटे कांदा  घेऊन सोलापूरकडे निघाले होते. मात्र रस्त्यातच त्यांच्या आयशर टेम्पो (क्र. एम. एच.16, ए. इ. 7704)वरील चालकाचा  ताबा सुटला आणि हा अपघात घडला.

 

यात 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे. मोहन भागवत मुंढे (वय 50 वर्षे ) देवराम धोंडीराम शिंदे (वय 50 वर्षे) सज्जत शकलम शेख ( वय 30 वर्षे ) अशी मयतांची नावे आहेत. तर भागवत शिवाजी मुंढे असे जखमींचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथे हलवण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!