जालना : वृत्तसंस्था
राज्यात नवरात्राची मोठी धामधूम सुरु असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करीत असतांना नुकतेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार बीड जिल्ह्यातील नारायणगडावर, १२ ऑक्टोबरला दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून समाजबांधवजाणार आहेत. जालन्यातील मराठा बांधवांची पूर्वतयारी बैठक गुरुवारीपार पडली आहे. जालना जिल्ह्यातून९ हजार चारचाकी वाहनांतून, लाखो समाजबांधव जाणार आहेत. तसेच स्वतःचे जेवणही ते सोबत घेऊन जातील, याचे नियोजन केले.
मराठा समाजातील तरुणांनी गावपातळीवर बैठका घेऊन, मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केलेआहे. प्रत्येक कुटुंबातून एकजण यामेळाव्याला जाईल, असा निर्णयअनेक गावांमध्ये घेण्यात आलाआहे. मेळाव्याला जाण्यासाठीजालना जिल्ह्यातील तालुकानिहाय,गावनिहाय बैठका पार पडल्याआहेत. अनेकांनी कुणी वाहनांसाठीपेट्रोल तर कुणी मोफत प्रवासासाठीमदत केली आहे. दुचाकी, चारचाकीवाहनातून बीडकडे जात असतानाकुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी,वाहतूक खोळंबणार नाही असे कृत्यकरणार नाही याबाबत निर्णय घेण्यातआला आहे. या मेळाव्याला जाणारअसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीहोणार आहे. गुरुवारी पार पडलेल्याबैठकीप्रसंगी प्रत्येक तालुक्यातीलपदाधिकारी उपस्थित होते.
हरियाणा आणि महाराष्ट्राची परिस्थितीवेगळी आहे, त्यामुळे जे तिथे झाले ते इथे हाेणार नाही.आचारसंहिता लागण्याआधी मराठ्यांना आरक्षण द्या.मराठ्यांना आरक्षण देण्याआधी तुम्ही आचारसंहितालावली, तर मग तुम्हाला कचका दाखवतो. तुमचेसगळे पाडतो, असा इशारा मनोजजरांगे यांनी महायुती सरकारलादिला. जरांगे पाटील यांनी गुरुवारीआंतरवालीत संवाद साधला.सरकारने या जातींना ओबीसीतघेताना मविआकडून लिहून घेतलेआहे का, असा सवाल त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मराठ्यांचा खेळ संपवला. नव्या १५जाती ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस राज्यसरकारने केंद्राकडे केली आहे. याचा जरांगे यांनीचांगलाच समाचार घेतला. आता ओबीसी नेते झोपलेआहेत का, येवल्याचा डुप्लिकेट नेता कुठे आहे, आताया जातींना विरोध का केला नाही, असे प्रश्न विचारतजरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली. तर गिरीशमहाजन यांचाही समाचार घेतला.
मेळाव्याविषयी जनजागृतीकरण्यासाठी समन्वयकांनी छत्रपतीसंभाजीनगरात ३५ बैठका घेतल्या.त्यानुसार २ हजारांपेक्षा अधिकवाहने नारायणगडावर जाणार आहेत.राज्य सरकारने ओबीसी आरक्षणात१५ जातींचा समावेश करण्याचीशिफारस केंद्र सरकारकडे केली. यानिर्णयाचे मराठा समाजाने स्वागतकेले आहे. मेळाव्यानंतर पुढीलव्यूहरचना आखली जाईल, अशीमाहिती सुरेश वाकडे यांनी दिली.