मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का होता.त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं भाजपचा चारी मुंड्या चित पराभव झाला होता.
आता पुन्हा एकदा भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे. गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर 618 ग्रांमपंतायतींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र लढणार आहे. तशी माहिती महाविकास आघाडीच्या गोटातून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ग्रांमपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळालं तर अनेक गावातील राजकीय समिकरणे बदलणार हे निश्चित मानलं जात आहे.