ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपची पहिली यादी फायनल : फडणवीस, बावनकुळे दिल्लीला रवाना

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणूक येत्या दोन दिवसावर घोषित होणार असतांना भाजपच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. या यादीवर भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वासह चर्चा होणार आहे. यासाठी फडणीस आणि भाजपचे इतर प्रमुख नेते मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतर भाजपची पहिली यादी जवळपास अंतिम होण्याची शक्यता आहे.

महायुतीमध्ये जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. भाजप 160 जागा लढवणार आहे. उरलेल्या 128 पैकी शिंदे सेनेला 80 जागा तर राष्ट्रवादी दादा गटाला 48 जागा जवळपास निश्चित आहेत. यातून तिन्ही पक्षांना मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. स्वत: भाजपमध्येही छुपी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पक्षशिस्तीमुळे उघडपणे भाजपतील कुणी बंडखोरी करण्याचे धाडस दाखवणार नाही.

मात्र, आतून विरोध होऊ शकतो. हे लक्षात घेता कोणती जागा, काेणत्या पक्षाला सुटली हे जाहीर केले जाणार नाही. कारण ते माहिती झाले तर बाहेरून आलेले बंडखोरी करीत इतर पक्षात जाऊ शकतात. म्हणून आचारसंहिता जाहीर झाली तरी यादी जाहीर करण्याची घाई महायुती करणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपने 150 ते 160 जागा लढवल्यास 90 ते 95 जागा निवडून येऊ शकतात, असा प्राथमिक अहवाल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!