ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आम्ही आणि राज ठाकरे एकत्र आलो तर ; संभाजी राजे

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. महायुती, महाविकास आघाडी यांच्यानंतर संभाजी राजे, बच्चू कडू आणि राजू यांनीही एक तिसरी आघाडी स्थापन केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो चा नारा दिला आहे. दरम्यान, विधानसभेला मनसेसोबत येणार का? असा सवाल संभाजी राजे यांना विचारला असता राज ठाकरेंचे आणि आमचे व्यक्तिमत्व वेगवेगळे आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊ हे नाकारु शकत नाही. आम्ही आणि राज ठाकरे एकत्र आलो तर राज्यालील गड किल्ल्यांच्या विषयाला चांगली दिशा देऊ शकतो, असे वक्तव्य संभाजी राजे यांनी केले आहे.

संभाजी राजे म्हणाले, राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला, ही चांगली गोष्ट आहे. आमची सुरुवात आहे, म्हणून आम्ही महाशक्ती निर्माण केली आहे. प्रस्थापितांपेक्षा आम्ही विस्थापितांना तिकीट देऊ, प्रस्थापित लोक आले तर त्यांना सुद्धा स्वीकारू. महाशक्तीमुळे वातावरण बदलण्या सुरुवात झाली असून चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांना चांगला पर्याय मिळत आहे. आम्ही जास्तीत जास्त 288 जागांवर निवडणूक लढवणार असून येत्या तीन-चार दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असेही संभाजी राजे म्हणाले.

पुढे बोलताना संभाजी राजे म्हणाले, राज ठाकरे जे बोलतात ते पूर्ण चुकीचे बोलत नाहीत. शिवस्मारकासाठी त्यावेळी 3 हजार कोटी रुपये देतो म्हणाले होते. पण आज ती रक्कम 15 हजार कोटी रुपये झाली आहे. उद्या किती होतील? असा सवाल संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. गड-किल्ले जिवंत स्मारके आहेत. त्यांचे संवर्धन व्हायला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांनी राज्यातील गड किल्ल्यांसाठी 75 वर्षांत काय केले याचे उत्तर द्यावे. मी सरकारकडे 25 किल्ले मागितले. आम्ही पैसा उभा करतो असेही म्हटले. तरीही ते द्यायला तयार नाहीत. राज ठाकरे आणि मी या विषयावर एकत्र आलो, तर महाराष्ट्र गड किल्ल्याच्या विषयाला चांगली दिशा देऊ शकतो, असा विश्वास संभाजी राजे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!