‘परिवर्तन महाशक्ती’ची उमेदवार यादी जाहीर

 

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्या ‘परिवर्तन महाशक्ती’ आघाडीने आपली पहिली आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला चार जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून ऐरोली मतदारसंघातून अंकुश सखाराम कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवार मतदारसंघ पक्ष

बच्चू कडू – अचलपूर प्रहार जनशक्ती पक्ष

अनिल चौधरी – रावेर प्रहार जनशक्ती पक्ष

गणेश निंबाळकर – चांदवड प्रहार जनशक्ती पक्ष

सुभाष साबणे – बिलोली प्रहार जनशक्ती पक्ष

अंकुश कदम – ऐरोली महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

माधव देवसरकर – हद‌गाव हिमायतनगर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

गोविंदराव भवर – हिंगोली महाराष्ट्र राज्य समिती

वामनराव चटप – राजुरा स्वतंत्र भारत पक्ष

Leave a Comment