ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नव्या पक्षाची एन्ट्री.. रविकांत तुपकरांची मोठी घोषणा

बुलढाणा वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय वातावरण तापले असून आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाने एन्ट्री घेतली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामधून जाहीर मेळावा घेत ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’ची स्थापना केली आहे. या पक्ष स्थापनेनंतर राज्यात गनिमी काव्याने निवडणूक लढवावी लागेल, असे सूचक संकेत सुध्दा रविकांत तुपकर यांनी दिले आहेत.

विकांत तुपकर यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार सुद्धा व्यक्त केला आहे. आपला प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिला आहे. यामध्ये बुलढाणा विधानसभा मिळण्याची प्रकर्षाने मागणी केली आहे. सकारात्मक निर्णय होत असेल तर ठीक आहे, अन्यथा आपण आपला निर्णय घेऊ. असे रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

पाठिंबा कुणाला?

रविकांत तुपकर काय म्हणालेत.. आपली शेतकऱ्यांची वोट बँक राज्यातील 27 जिल्ह्यात आहे. त्यांचा निर्णय उद्यापर्यंत कळवा. ज्या जागा निवडून येणार असतील त्याच जागा आपण लढविणार आहे. आम्हाला सन्मानाने सोबत घ्या, लाचारी करणार नाही. पहिला पर्याय महाविकास आघाडीचा, तिसरा पर्याय वंचितचा मग चौथा पर्याय स्वतंत्र राहील. मात्र महायुतीसोबत जायचे नाही. महाविकास आघाडी किंवा वंचित हे दोनच पर्याय आहेत. अन्यथा कोणाला पाडायचं व कोणाला निवडून आणायचं यावर लक्ष केंद्रित करु. गनिमी काव्याने ही निवडणूक लढवावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!