ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनसेची यादी जाहीर : सोलापूर शहर उत्तरमधून परशुराम इंगळे

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात निवडणुकीच्या यादीचा कहर सुरु झाला असून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे.

अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल डोंबिवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली होती. राज ठाकरे यांनी आपल्या 5 मिनिटांच्या भाषणात राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती. सोलापूर शहर उत्तरमधून परशुराम इंगळे यांना संधी मिळाली आहे.

 

 

कल्याण ग्रामीणमधूम राजू पाटील, माहीममधून अमित ठाकरे, भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव, मुरबाड मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संगिता चेंदवणकर यांची बदलापूर अत्याचार प्रकरणात लावून धरण्यात निर्णायक भूमिका ठरली होती. पुण्यात कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसर येथून साईनाथ बाबार, खडकवासलातून मयुरेश वांजळे, मागाठाणे येथून नयन कदम, बोरीवलीत कुणाल माईणकर, दहिसर मतदारसंघातून राजेश येरुणकर, दिंडोशीतून भास्कर परब, वर्सोवा मतदारसंघातून संदेश देसाई, कांदिवली पूर्वेतून महेश फरकासे, गोरेगाव येथून विरेंद्र जाधव, चारकोप दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्वेतून भालचंद्र अंबुरे, विक्रोळीत विश्नजित ढोलम, घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्वेतून संदीप कुलथे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!