ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना लसीबाबत आरोग्यमंत्री टोपेंची महत्वाची माहिती

मुंबई : कोरोना लसीकरणाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  आज महत्त्वाची माहिती दिली.

आपल्या देशात आणि राज्यात करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाची जोरदार पूर्व तयारी सुरु झाली आहे. केंद्र सरकारने करोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलं आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल अशी टोपे यांनी दिली आहे.

 

लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

 

“१८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचं मायक्रो प्लानिंग सुरु असल्या”चं टोपे यांनी सांगितलं.

 

” करोनाचा प्रतिबंध करणारी लस केंद्र सरकार पुरवेल अशी आम्हाला खात्री आहे. जी कामं राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतो आहोत. लॉजिस्टिक, डेटा या सगळ्याची कामं सुरु आहेत. लसीकरणाच्या परिमाणाबाबत एक युनिट तयार करण्यात आलं आहे. सीरम आणि भारत बायोटेक यांनी लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आता निर्णय केंद्राला करायचा आहे” असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!