---Advertisement---

विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवालांसह आमदारांनी कृषी कायद्यांच्या प्रति फाडल्या !

On: December 17, 2020 7:04 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांवरून ऐन कडाक्याच्या थंडीत दिल्लीचं तापमान वाढलं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन, सुप्रीम कोर्टात सुनावणी, केंद्रीय मंत्र्यांच्या बैठक तर दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आमदारांनी कृषी कायद्यांच्या प्रति फाडल्या. यावेळी आम आदमी पक्षाच्या आमदारांनी जय जवान, जय किसान अशी घोषणाबाजी केली.

करोना संकटाच्या काळात संसदेत इतक्या घाईघाईत कृषी कायदे मंजूर का केले गेली? राज्यसभेत तर कुठलंही मतदान घेता तिन्ही कृषी कायदे मंजूर झाले. याचा निषेध करतो आणि तिन्ही कृषी कायद्यांच्या प्रति फाडतो. केंद्र सरकारने ब्रिटीशांहून अधिक क्रूर होण्याचा प्रयत्न करू असं आवाहन करतो, अरविंद केजरीवाल म्हणाले.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवत आहे. तर या कायद्यांमुळे कुणाचीही जमीन जाणार नाही, असं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहे. हा कुठला फायदा आहे?, असं सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!