---Advertisement---

मनसेकडून चौथी यादी जाहीर, पाच नावांची घोषण

By team
On: October 25, 2024 8:33 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

मुंबई, वृत्तसंस्था

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. चौथ्या यादीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईतील मतदारसंघाचा समावेश आहे.

मनसेने पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे. विदर्भातील चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या श्वेता महाले यांच्याविरोधात गणेश बरबडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अभिजित राऊत, बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात रमेश गालफाडे आणि मुंबईतील कलीना विधानसभा मतदारसंघातून संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!