जालना वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मनोज जरांगे यांनी मोठा निर्णय घेऊन सर्व पक्षांचे टेन्शन वाढवले आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. तर २० तारखेला मतदान होणार आहे. आणि २३ तारखेला निकाल लागणार आहे. जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडणार आणि कुणाविरोधात लढणार या मतदारसंघाची थेट नावं जाहीर केली आहे. पाटील यांनी दिलेल्या यादीत काही ठिकाणी महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यानं दोन्ही आघाड्यांची धाकधूक वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला अल्टीमेटम दिला होता. मात्र, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधात आपले उमेदवार उभे करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी राज्यातील अनेक मतदार संघातून त्यांचे उमेदवार उभे केले आहे. उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणचे उमेदवार पडणार याची यादीच जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. या यादीत मराठवाड्यातील मतदार संघाची यादी त्यांनी वाचून दाखवली. या मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उभे असल्याने दोघांचं टेन्शन वाढलं आहे.
या मतदारसंघात उमेदवार पाडणार?
गंगापूर मतदार संघ, कन्नड मतदार संघ, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदार संघ पाडणार असल्याचं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.
या मतदार संघात उमेदवार केले उभे
जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील केज मतदार संघातून आपल्या शिलेदाराला उभे केले आहे. तर जालना जिल्ह्यातील मंठा परतूर या मतदार संघातून देखील उमेदवार उभा केला आहे. तर संभाजीनगरमधील फुलंब्री मतदार संघात देखील उमेदवार उभा करण्यात आला आहे. औरंगाबाद पश्चिम पाठिंबा देणार असल्याच त्यांनी जाहीर केलं आहे.