---Advertisement---

अक्कलकोट येथे महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन

By team
On: November 3, 2024 5:21 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने दीपावलीच्या सुट्टीमुळे महाप्रसादा करिता होणाऱ्या गर्दीचे उत्कृष्ट नियोजन केल्याने भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.

तीर्थटणातून पर्यटनबाबत न्यासाच्या परिसरात दत्त मंदिर, स्वामींचा रथ यासह श्रीमंत कांतामतीराजे भोसले वाचनालय, अश्रयदात्यांचे कक्ष, स्वामी सदन- धान्य कोठार, सभागृह, कार्यालय, सिंहांनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वामींची भव्य उभी ३० फुटी मुर्ती, दिपमाळा, वारूळातून प्रकटले परब्रम्ह, कपिला गाय, शिवस्मारक, श्री गणेश मंदिर इमारत, श्री शमी विघ्नेश गणपती मंदिर, श्री तुळजाभवानी माता मंदिर, हिरकणी कक्ष, दिव्यांग रुग्णांसाठी बग्गी, आऊटडोअर जीम, यात्री भवन, यात्री निवास, अतिथी निवास, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एटीएम, श्री स्वामी समर्थ वाटिका व बालो उद्योन, जॉगिंग ट्रॅक, वाहन तळ,  भक्तांची सोय,  याबाबत तीर्थ क्षेत्र नगरीतील विविध मुख्य मार्गावर कटाऊटस् लाऊन स्वामीं भक्तांना सुलभ व्यवस्था होण्या कामी अन्नछत्र मंडळाकडून सोय करण्यात आली आहे.

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले हे दोघेही महाप्रसादालयात स्वतः पहाणी करीत भक्तांची संवाद साधले. जेष्ठ नागरिक व अंध-अपंग भक्तांकरिता महाप्रसादासाठी थेट सोडण्याच्या व्यवस्था केल्याने सदर जणांनी समाधान व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!