---Advertisement---

भाजपला धक्का! पंढरपुरचा हा बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

On: December 18, 2020 5:55 PM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर: भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

 

सरकोली येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. तसेच कल्याणराव काळे हे शरद पवारांच्या गाडीतून सरकोलीतील दिवंगत आमदार भारत भालके यांच्या घरी दाखल झाल्याचं पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

 

विशेष म्हणजे शरद पवार यांनी आपल्या भाषणात आमदार कल्याण काळे यांचा आवर्जुन उल्लेख केला. एवढंच काय तर यापुढे शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं आपण काम करू, असंही आमदार कल्याणराव काळे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

 

आमदार काळे यांच्या या वक्तव्यानंतर ते लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. एकूणात या सगळ्या प्रकारामुळे राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून राष्ट्रवादीची पुनर्बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

 

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक भाजप नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!