मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरले जात होते. तेव्हा एका मोठ्या मंत्र्याने फोन केला होता. माझ्यासोबत 8 आमदार आहेत आणि आम्ही येथे मोठे बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागतो आणि परत येतो. पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा बहुमताने विजय होईल. तसेच भाजपाच्या बदललेल्या मानसिकतेवर बोट ठेवले. आजचे भाजपाचे पाच प्रमुख चेहरे आहेत, ते सगळे 2019 नंतरचे आयात केलेले आहेत. फसवाफसवीचे राजकारण केले जाते. तुम्हाला महापौरपदही सोडायचे नाही. हौसिंग सोसायटी, स्पोर्ट्स क्लब पाहिजे. ही हाव आहे आणि मित्रपक्षांना सोबत न घेता संपवून टाकू, ही वृत्ती आहे. आता जरी तुम्हाला मित्रांची गरज नसली तरी, कधी ना कधी तरी मित्रांची गरज लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. आज 240 वर आल्यानंतर कोण मित्र बनले आहेत? तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू, त्यांचे मोदी, आरएसएस, भाजपा यांच्या बद्दलचे मत सर्वांना माहीत आहे. दुसरे जदयूचे नितीश कुमार आहेत. ते पुढच्या तीन-चार महिन्यात आमचे मित्र बनतील हे भाजपाला कळणार देखील नाही, असा आणखी एक गौप्यस्फोट त्यांनी केला.
गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरले जात होते. तेव्हा एका मोठ्या मंत्र्याने फोन केला होता. माझ्यासोबत 8 आमदार आहेत आणि आम्ही येथे मोठे बंड करत आहोत. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागतो आणि परत येतो, असे सांगितले. पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. अनेक लोक पक्ष बदलतात, विचारधारा बदलतात पण पक्ष फोडला, पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरण्याचे धाडस केले. एवढेच नव्हे तर, तुम्ही आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरत आहात आणि ते सुद्धा माझ्या बाबांनीच काढलेले. या चोरांना आम्ही परत घेणार नाही. जे टेबलावर नाचले, ते एक एक नमुने जनतेसमोर घेऊन जाऊ? पुढच्या पिढीसाठी हे आदर्श असणार? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कधीकाळी यांच्या बाजूला बसलो, यांचा प्रचार केला याची घाण वाटते. महाराष्ट्राचे भाजपाकरण पाहत आहोत. आम्ही कधीही त्यांना माफ करू शकत नाही.