अक्कलकोट वृत्तसंस्था
सत्तेत राहून जे सत्तर वर्षात करू शकले नाहीत ते आम्ही पाच वर्षात केले. विरोधकांना विकासावर बोलण्याचा अधिकारच नाही, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट मतदारसंघातील सलगर या गावात निवडणुकीच्या प्रचारार्थ बैठक घेतली. यावेळी गावात शेतकऱ्यांनी आणि महिलांनी जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. गावातील महिलांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होती. यावेळी महिला भगिनींशी बोलताना त्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे समजले. या सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना याच्या सोबतच सरकारने महिलांसाठी आणलेल्या महत्त्वपूर्ण योजनांचे स्वागत करत मला निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
सलगर गावात पंचशील बुद्ध विहार येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, सोमेश्वर सांस्कृतिक भवन बांधकाम व सुशोभीकरण, कोळी समाज, यल्लमा मंदिर, अंबाबाई मंदिर येथे सभामंडप बांधकाम, सलगर ते भीमपूर रस्ता सुधारणा, सोमेश्वर मंदिर ते गंगप्पा बोरगाव घरापर्यंत सिमेंट रस्ता, भुलेश्वर मंदिर ते जि. प. शाळेपर्यंत सिमेंट रस्ता, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा सोय, मरगळ कोळी वस्तीमध्ये समाज मंदिर अशी कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे गावांतर्गत सिमेंट रस्ते, शरण बसवेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधकाम, देसाई शेत ते चिकमळी शेतापर्यंत पाणंद रस्ता या कामांना मंजुरी मिळालेली आहे.
या सर्व कामांच्या जोरावर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आमदार कल्याणशेट्टी यांना निवडून देण्यासाठी संजय देशमुख, दिलीप सिद्धे,अविनाश मडीखांबे यांनी आवाहन केले. यावेळी जयशेखर पाटील, आनंद तानवडे, अशोक पाटील, शिवराज बिराजदार, बाबुराव होरपेटी, अशोक बिराजदार, बसवराज शटगार, अनंत रामदासी, शरणप्पा कोळी, सुभाष पाटील, सायबणा शेळके, नागण्णा समाणे, निलेश शटगार, बसवराज बिराजदार, राजकुमार झिंगाडे,अमोल पुटगे आदिंसह भाजप- महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.