ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

नाशिक वृत्तसंस्था 

 

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच भाजपसाठी वाईट बातमी समोर येत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण  यांचे आज सकाळी निधन झाले आहे.

काही दिवसांपासून हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते. भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते. मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते.

हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2014 मध्ये त्यांनी भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, 2019 मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी 1 लाख 98 हजार 779 मतांनी विजय मिळवला होता.

यानंतर 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक होते. मात्र, भाजपने भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांना दिंडोरी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र,आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हणत त्यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली होती. नाशिकच्या पिंपळगाव येथे लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत देखील हरिश्चंद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन झाल्याने दिंडोरीवर शोककळा पसरली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!