ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाच वर्षात तडवळ भागाचा अनुशेष भरून काढला

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा प्रचार दौरा

अक्कलकोट वृत्तसंस्था

मागच्या सत्तर वर्षात तडवळ भागात कधीही इतकी मोठे रस्त्याची कामे झाले नाहीत. तितकी कामे आम्ही महायुतीच्या सरकारच्या काळात केली. त्यामुळे तडवळ भागातून मोठ्या मताधिक्याने आपल्याला बळ मिळेल, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.

बुधवारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ तडवळ गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात या गावात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली. काही ठिकाणी नवीन रस्त्यांचे बांधणी, काही ठिकाणी दुरुस्ती तर डांबरीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. रस्त्यांचे जाळे विस्तारल्यामुळे गावकऱ्यांना मोठा फायदा झाला. या कामाच्या जोरावरतीच गावकऱ्यांना पुन्हा भाजपला मतदान देण्याचे आवाहन केले.

तडवळ गावात बंदिस्त गटारे, देवीच्या मंदिरांसमोर आणि श्री श्री श्री जगदगुरू हडपद आप्पण्णा महाराज संस्था मठासमोर सभामंडप बांधणे, वर्गखोली दुरूस्ती करणे, तडवळ ते सुलेरजवळगे रस्ता सुधारणा करणे, आळगे ते तडवळ रस्ता सुधारणा करणे, पानमंगळूर ते तडवळ – मुंढेवाडी – कोर्सेगाव रस्ता, सुलेरजवळगे – तडवळ – अंकलगे रस्ता टप्पा  1 आणि 2, तडवळ ते आळगी रस्ता सुधारणा, तडवळ ते म्हैसलगी रस्ता सुधारणा, गुड्डेवाडी ते तडवळ रस्ता सुधारणा, तडवळ ते अंकलगी आणि खानापूरपर्यत असे रस्ते तयार करणे,  अशी विकासाची कामे झाली किंवा होत आहेत.

याशिवाय भिमनगर ते राहुल वाघमारे ते लायप्पा गायकवाड घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे, अंकलगी गेट ते बुळकावस्तीपर्यंत पाणंद रस्ता करणे, नविन  अंगणवाडी बांधणे, अक्कलकोट – जेऊर – करजगी – पानमंगळूर – तळवड – कोर्सेगाव रस्ता सुधारणा करणे, जलजीवन मिशन अंतर्गत नळाव्दारे पाणी पुरवठा करणे ही कामे मंजूर झाली आहेत. त्या कामांच्या जोरावर या भागातून मला मताधिक्य मिळेल.जनता हुशार आहे. योग्य वेळी चांगला निर्णय घेईल असे ते म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील, दिलीप सिद्धे,परमेश्वर यादवाड, संजय देशमुख, रामचंद्र अरवत,  अविनाश मडीखांबे, सुरेश सद्दलगी,  सुरेश गड्डी, अण्णाप्पा याबाजी, डॉ. अशोक हिप्परगी,  विकी ईश्वरकट्टी, अजय मुकणार,  बाबुशा करपे, महादेव दोड्याळे, सिद्धाराम बाके,  सिद्धाराम उमदी, अजीज सुतार, अनिल पाटील,विठ्ठल विजापुरे, बाबुशा कोडते, सैपन पटेल, बाबा टक्कळकी, शांतू कुंभार, शिवानंद मानशेट्टी,राघु याबाजी, अमित मानशेट्टी, हर्षद कुलकर्णी, कलप्पा माळी,  दयानंद उंबरजे, गुरु मुडगी आदिंसह भाजप महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!