ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात सलग ३ दिवस शाळांना सुट्ट्या

मुंबई वृत्तसंस्था 

 

राज्यात विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात शाळा भरवू शकत नाहीत त्या शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे.

शासनाने राज्यातील शाळांचा 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने आधीच हॉलिडे आहे. शहरातील अनेक शाळांना शनिवारची सुट्टी असते, तर रविवारी आठवडा सुट्टी असते. यानंतर सोमवारी १८ तारखेपासून २० पर्यंत राज्य शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. ज्या शाळांना शनिवारी सुट्टी नाही त्या शाळांनाच फक्त कामकाज करावे लागणार आहे.

मोठ्या प्रमाणावर शाळांतील शिक्षक निवडणूक ड्युटीवर आहेत. यामुळे अनेक शाळा विद्यार्थी आले तरी त्यांना शिकवू शकत नाहीत. या शिक्षकांना आधीच मतदान केंद्रे नेमून दिलेली आहेत. त्यांना त्यांचे साहित्य ताब्यात घेऊन त्या मतदान केंद्रांवर पोहोचायचे आहे. बरीच तयारी बाकी आहे, यामुळे हे शिक्षक शाळेत येऊ शकत नाहीत. यामुळे ज्या ठिकाणी या कारणामुळे शाळा भरविता येणे शक्य नाही तिथे शासनाने शाळांना सुट्टी घेण्यास सांगितले आहे.

अशा ठिकाणच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे पत्र राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे. राज्य सरकारने ही अट ठेवल्याने पालकांना शाळेत विचारूनच मुलांना शाळेत पाठवावे लागणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!