---Advertisement---

मनसेचा जाहीरनामा प्रकाशित, महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य

By team
On: November 15, 2024 6:15 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

 

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाचा जाहीरनाम्यात प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी ‘आम्ही हे करू’ या यावाने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य देण्यात आलं आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकाच दिला आहे. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 19 वर्ष झाले आहे. या 19 वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे.

 

मी 2006 रोजी राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती 2014ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. 2014ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत प्रश्न बदललेले नाहीत अद्यापही तेच प्रश्न आहेत अद्यापही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे. आज आमच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांना किंवा नेत्यांना मी इथे बोललो नाही कारण ते आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार करत आहेत त्यामुळे मी त्यांना त्रास दिला नाही इथे बोललेला नाही असे पुढे राज ठाकरे म्हणाले.

 

जाहिरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे. माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेने आपण जाहीरनामा समोर ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!