कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेत येईल
मैंदर्गी येथे उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांची जाहीर सभा
अक्कलकोट वृत्तसंस्था
भाजपामुळे देशाला फार मोठे गंडातर आहे. हे धर्माधर्मात भांडणे लावत आहेत. महाराष्ट्रातले हे भाजपा सरकार ड्युप्लीकेट सरकार आहे. कर्नाटकात केलेल्या आँपरेशन लोटस प्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांना काढुन हे सरकार सत्तेत आले. जसे कर्नाटक मध्ये काँग्रेसला पुर्ण बहुमत मिळाले तसेच महाराष्ट्रातही काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेत येईल,असा विश्वास कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी व्यक्त केला.मैंदर्गी येथे शनिवारी आयोजित काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार आलमप्रभू पाटील, तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, आर. के. पाटील,शिवानंद पाटील, पक्ष निरीक्षक वीणा कशप्पनवरू,अशपाक बळोरगी,प्रथमेश म्हेत्रे, नरेंद्र कल्याणशेट्टी, आनंद बुकान्नुरे, व्यंकट मोरे,अरुण पाटील, राजू चव्हाण, होळप्पा खेड, बसवराज बमदे, यल्लाप्पा पोतेनवरू, संतोष बिराजदार, राजशेखर अरेनवरू, उमेश पोतेनवरू, नागणा इमाम बागवान, शितलताई पोतोनवरु, दत्ता थोरे, महानंदा सावळी, सुरेखा गोब्बुर, काशिनाथ दिवटे, बाबासाहेब पाटील आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवकुमार म्हणाले, काँग्रेस पक्ष दिलेला प्रत्येक शब्द पाळत असतो. त्यामुळे काँग्रेसने दिलेले पाच गँरन्टी प्रत्येक गृहिणीला महालक्ष्मी योजनेतुन तीन हजार रूपये, शेतकरी यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, प्रत्येक कुंटुंबाला २५ लाख रूपया पर्यंत आरोग्य विमा, बेरोजगारांना चार हजार रूपये बेकारी भत्ता, महिलांना मोफत बस योजना पहिल्याच कँबिनेट मध्ये देऊ असे मी वचन देतो. जसे आम्ही कर्नाटकमध्ये केले आहे तसेच महाराष्ट्रातही देऊ. पाच गँरन्टी दिलेले आहे. काँग्रेस सरकार स्थापन करील. विविध योजना काँग्रेस सुरु केले आहेत. काँग्रेस मध्ये सर्व धर्माना समान वागणुक दिली जाते. कोणाला घाबरायचे नाही. मी शब्द देतो,असे आश्वासन त्यांनी दिले.काँग्रेस समानता मानणारा पक्ष आहे. कमळ चिखलात असले तर बरे व सत्ता काँग्रेसच्या हातात सत्ता असले तर बरे. काँग्रेसला महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी बोलताना उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, ही ऐतिहासिक भावी पिढी घडवणारी निवडणूक आहे. प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. सर्व उद्योगधंदे गुजरातला हलवले आहेत. देशाचे तीस टक्के उत्पन्न एकट्या मुंबईचे आहे. महाराष्ट्र उध्वस्त करायचे आहे. सर्व जाती धर्मांचे आंदोलन सुरु आहेत. जाती जातीत भांडणे लावले जात आहेत. प्रचंड महागाई वाढली आहे. भाजपाने आठ दहा उद्योगपतींचे साडेसोळा कोटी रूपये माफ केले आहेत. या रकमेतुन करोडो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असता. खत महागले. प्रचंड महागाई वाढली आहे. आम्ही केलेले रस्ते जेसीबीनेही उखडत नाहीत तर त्यांनी केलेले रस्ते बोटाने उखडत आहेत. दर आठवड्याला शंभर कोटी नुसतेच वर्तमानपत्र दिसते आहे. भष्ट्र लोकांना हाकलले पाहिजे. लोकशाहीमध्ये लोक मालक आहेत.आम्ही सेवक आहोत,असेही ते म्हणाले.यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.