ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बारामती ॲग्रोच्या अधिकाऱ्याकडे सापडली मोठी रोकड

अहमदनगर वृत्तसंस्था 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या कंपनीतील एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.  कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीचे अधिकारी मोहिते याला अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडे काही प्रमाणात रोकड सापडल्याचं समजतंय. पैसे वाटप केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे. हे पैसे वाटण्याकरता आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

ज्या अधिकाऱ्याला पकडण्यात आले त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. या व्हिडीओमध्ये हे पैसे मी द्यायला आणले होते, असे संबंधीत व्यक्ती सांगत आहे. पुढे ती व्यक्ती म्हणाले, कोणाला पैसे द्यायचे आहे त्यांची नाव मी सांगू शकत नाही. कॅशिअरने मला चिठ्ठी दिली होती.

हा वेडेपणा सगळा आहे. रोहित पवारांनी हे आरोप फेटाळले मात्र ती व्यक्ती कारखान्याशी संबंधित आहे का हे सांगितले नाही, हे उत्तर रोहित पवारांनी टाळले. यानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मी या संदर्भात माझी भूमिका थोड्याच वेळात मांडणार असे सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!