मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित होऊन महायुतीचा दणदणीत विजय झालाय. आता महायुतीच्या सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलीय. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत. मुख्यमंत्रिपदी अजित पवारांचीही अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन पक्षांमध्ये सत्ता वाटप करताना काही फॉर्म्युल्यांवर विचार होऊ शकतो.
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झालीय. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. रेकॉर्डब्रेक जागा जिंकून आणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांचा पुन्हा ‘राजतिलक’ होणार का याबाबतची चर्चा सुरु झालीय. अजितदादांनाही मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते मुख्यमंत्रीपदासाठी काही फॉर्म्य़ुल्यावर विचार होऊ शकतो.
फॉर्म्युला क्रमांक-1
शिवसेना 1 वर्ष राष्ट्रवादी 1 वर्ष आणि भाजपला 3 वर्ष अशी मुख्यमंत्रिपदाची वाटणी होऊ शकते
फॉर्म्युला क्रमांक-2
भाजपला 5 वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला महत्वाची खाती अशीही सत्तापदांची विभागणी होऊ शकते
फॉर्म्युला क्रमांक-3
भाजपला 2.5 वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला 15 महिने शिवसेनेला 15 महिने मुख्यमंत्रिपद मिळू शकते.
भाजपमधील फडणवीस समर्थक मात्र छातीठोकपणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सांगतात. शिवसेना नेते तर पुन्हा एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी अशी मागणी करु लागलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आलेत. भाजपची साथ देणाऱ्या अजित पवारांनाही यावेळी संधी मिळेल असं त्याचे पाठिराखे सांगू लागलेत.
मुख्यमंत्री कोण होणार ?
महायुतीला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेने शिंदे पक्षानं 57 जागा जिंकल्या आहेत. त्याचसोबत त्यांना 4 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिदेंच्या आमरांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी भाजपच्या आमदारांची अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.