ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

मुंबई वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीनंतर  महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय. मिळालेल्या माहतीनुसार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपवल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. 2 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असला तरीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही. राज्यात सत्ता स्थापन झालेली नसली तरीही नवी १५ वी विधानसभा अस्तित्वात. निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, निवडणूक आयोगाच्या २४ नोव्हेंबरच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रविवारी राज्यपालांना सादर केल्या आहेत.

विधानसभेची मुदत आज संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे आज नियमानुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कोणत्याही आघाडीकडे बहुमताचा स्पष्ट आकडा असेल तर त्यांना तो आकडा राज्यपालांची भेट घेऊन तो सादर करावा लागतो. राज्यपाल यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी काही अवधी मागण्याची विनंती करावी लागते. पुढच्या ८ ते १० दिवसांत सरकार स्थापन करणार असल्याचं आश्वासित केल्यानंतर विधानसभेची मुदत संपल्यानंतरही सरकार स्थापन करता येतं. त्यामुळे या काळात नवं सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!