---Advertisement---

सलग चौथ्या दिवशी इंधन दर स्थिर ; जाणून घ्या आजचा दर

On: December 21, 2020 1:04 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौदाव्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. दोन आठवडे पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. एप्रिल महिन्यात साथीच्या उद्रेकामुळे मागणीवर परिणाम झाला, त्यामुळे ऐतिहासिक निचांक गाठल्यानंतर तेलाच्या भावात सुधारणा दिसून आली.

 

आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!