मुंबई, वृत्तसंस्था
मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावरती 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकूण 3 स्टेज असणार आहे.
शपथविधी सोहळ्याला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. शपथविधीसाठी भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप शासित राज्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा अशा महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे.
कोण कोणत्या नेत्यांना आमंत्रण
योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीश कुमार – मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा
भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंग सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय
भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान
मानिक साहा – मुख्यमंत्री, त्रिपुरा
पुष्कर सिंग धामी – मुख्यमंत्री, उत्तराखंड
कोणते संत उपस्थित राहणार?
नामदेव शास्त्री, भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
गौरांगदास महाराज, इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज
जैन मुनी लोकेश