पंढरपूर वृत्तसंस्था
पंढरपूरमधून मोठी बातमी समोर आलीय. पोलिसांनी मोठी कारवाई करत १० लाख रूपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या असून या नोटांमध्ये २०२९ नोटा या ५०० रूपयांच्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतोय.
तब्बल १० लाखांपेक्षा जास्त बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील मधुकर माने यांना एजंटकडून गाई गोठ्याचे अनुदान दहा लाख रूपयांचे अनुदान मिळाले होते.
५०० रूपयांच्या नोटा घेऊन माने बँकेत गेले. त्यावेळी त्या बनावट असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी त्याबाबत पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ राजू चोरमले आणि अतुल तावरे यांना अटक केली.