---Advertisement---

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा

By team
On: December 17, 2024 8:37 PM
Follow Us:
---Advertisement---

 

बीड वृत्तसंस्था 

 

सरपंच हत्या प्रकरणी राज्यात मोठी खळबळ उडाली होती.  बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या आठ दिवसांनंतर आता दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचे असल्याचं सांगण्यात येत आहे.

पहिला व्हिडीओ जो व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि निलंबनाची कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीचा आहे, ते केजमधील एका हॉटेलमध्ये भेटल्याचं दिसत आहे, पहिल्या व्हिडीओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडीओमध्ये चार मिनिटांचं अंतर आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये आरोपी सुदर्शन घुले, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांच्यासोबत ज्यांची हत्या झाली त्या संतोष पाटील यांचा भाऊ  धनंजय देशमुख हे देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये धनंजय देशमुख हे त्या दोघांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं अखेर या व्हिडीओप्रकरणात आता धनंजय देशमुख यांनीच खुलासा केला आहे.

 

 धनंजय देशमुख कोण ? 

मी आगोदरच हॉटेलमध्ये बसलो होतो. त्यांनी मला वेटरद्वारे इशारा केला आणि मला त्यांच्या टेबलवर बोलावून घेतले. सहा तारखेला जे भांडण झालं होतं, त्याबाबत ते विचार होते. पीएसआय राजेश पाटील यांच्याकडे या मारहाणीसंदर्भातील तपास होता. आमच्या गावचं मिटलं आहे असं मी त्यांना यावेळी सांगितलं. माझ्या भावाचा खून होणार असल्याची भनक मला लागली असती तर मी त्यांना भेटलोच नसतो. आम्ही त्या हॉटेलमध्ये चहा घेतला. चहाचं बिल देखील मी दिले. त्यावेळी हाच आपला घात करणार आहे हे मला माहीत देखील नव्हते. या प्रकरणात राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी धनंजय देशमुख यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आलं असून, चार जण फरार आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!