ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार शिवाजीराव पाटलांच्या हस्ते समर्थ महाप्रसाद लाभार्थ्यांना सतरंजी वाटप

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तजयंती निमित्त शनिवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून, न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला ३  वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून २२२ लाभार्थ्यांना चंदगड जिल्हा  कोल्हपुरचे आमदार शिवाजिराव पाटील यांच्या उपस्थितीत सतरंजी वाटप करण्यात आले.

दरम्यान आमदार शिवाजिराव पाटील व स्वामी भक्त देणगीदार यांच्या हस्ते महानैवेद्य, आरती संपन्न झाल्यानंतर आमदार पाटील यांच्या हस्ते महानैवेद्याचा संकल्प सोडण्यात आला. यासह न्यासाने सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला श्रीदत्त जयंतीच्या या दिवशी ३ वर्ष पूर्ण झाले असून, दररोज २२२ निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा ‘समर्थ महाप्रसाद’ डबा घरपोच दिला जातो.

यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार न्यासाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती  कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार पतीला समवेत गुरुनाथ बल्लाळ, गायत्री बल्लाळ, ऋषिकेश कुटरे, सिध्देश कोरगांवकर, समर्थ बल्लाळ, सागर राणे, आदित्य खुटले, धनाजी पाटील हे उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार न्यासाचे सदस्य अरविंद शिंदे यांनी मानले. राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेल्या पालख्यांचे स्वागत अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

 

राज्याच्या धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विविध क्षेत्रातील अफाट कार्य व परिसरातील विकासाने श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडत असून, धार्मिकते बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रात राज्याच्या धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे.

 आमदार शिवाजिराव पाटील 

 चंदगड, जिल्हा कोल्हपुर

 

समर्थ महाप्रसाद लाभार्थ्यांना सतरंजी वाटप 

गेल्या वर्षभरापासून न्यासाकडून दररोज २२२ निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद डबा घरपोच दिला जातो. अशांनकरिता शनिवारी  श्रीदत्त जयंती निमित लाभार्थ्यांना महाप्रसादा बरोबरच सतरंजी वाटप करण्यात आले. सदर लाभार्थ्यांना शहरातील विविध ठिकाणाहून वाहनांच्या माध्यमातून अन्नछत्र मंडळात आणण्यात आले. पहिल्या पंक्तीत महाप्रसाद घेतल्या नंतर लाभार्थ्यांना सतरंजी  वाटप  करण्यात आले.

अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोक आम्ही या अगोदर उपाशी राहून दिवस काढलो आहोत, मात्र श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या “समर्थ महाप्रसाद” सेवेमुळे आमच्यासारख्यांची भुकमार थांबल्याचे लाभार्थी श्रीमंत बनसोडे व फातिमा खोजे, मथुराबाई देडे यांनी सांगितले.

“समर्थ महाप्रसाद” सेवेने गेल्या ३ वर्षात मोठा टप्पा पार केला असून २२२ जणांना सकाळी व संध्याकाळी पुरेल असा घरपोच डबा देण्यात येत आहे. बाहेरून आलेल्यांची अन्नछत्रच्या माध्यमातून सेवा केली जाते. परंतु आपल्याजवळील निराधार, दिव्यांगांना आधार मिळावा म्हणून ही सेवा सन २०२१ च्या दत्तजयंतीपासुन देत असल्याचे न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी सांगितले.

या कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, श्रीक्षेत्र तुळजापूर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, रामचंद्रराव घाटगे, मनोज निकम, मुख्य लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, मुख्य  न्यासाचे अभियंता अमित थोरात, अभियंता किरण पाटील, सौरभ मोरे, शिवराज स्वामी, सिद्धेश्वर मोरे, रोहित खोबरे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, विजय माने, ज्ञानेश्वर भोसले, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, सागर सुतार, मैनुद्दीन कोरबू, रोहन शिर्के, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, गोरख माळी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, राजू पवार, गोविंदराव शिंदे, महादेव अनगले, भारत पाटील, चंद्रकांत कुंभार, सुमित कल्याणी, समीर शेख, सागर याळावर, पिंटू साठे, व निर्धारित वेळेत लाभार्थ्यांना डबा पोहच करणारे सेवेकरी अक्षय टोणपे, शिवराज मलवे, बलभीम पवार, अतिश पवार, प्रकाश पांढरे,  काशिनाथ वाले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!