शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे त्यांना आपले पीक नष्ट झाल्यास किंवा कमी झाल्यास आर्थिक संरक्षण मिळू शकते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आपली शेतजमीन आणि पिकांच्या नुकसानीपासून बचाव करणं आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने २०२२ ला या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला होता.
पीक विमा योजना शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत देतो. जसे की पाऊस, गारपीट, वादळ किंवा रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसानीचा सामना करावा लागतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाच्या नुकसानीसाठी दिलासा मिळतो. शेतकरी पीक विमा घेतल्यास, त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते आणि त्यांचा आर्थिक भुर्दंड कमी होतो.
असा करा ऑनलाईन अर्ज
पीक विमा योजनेसाठी तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.
सर्वप्रथम http://pmfby.gov.in हा वेबसाईट पत्ता ब्राउझरमध्ये टाका. यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट उघडेल.
वेबसाईट उघडल्यानंतर Farmer Application या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करा.
नोंदणीसाठी तुमचं नाव, रिलेशनशिप (मुलगा, मुलगी, पत्नी वगैरे) आणि वडिलांचे किंवा पतीचे नाव भरावं लागेल.
तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Verify वर क्लिक करा. आता स्क्रीनवर एक Captcha कोड दिसेल, तो टाकून Get OTP क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Submit करा. वय, जात, लिंग माहिती भरा: तुमचं वय, जात आणि लिंग निवडा.
शेतकऱ्याचा प्रकार (अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक) आणि जमिनीचे प्रकार (मालक किंवा भाडेपट्टा) निवडा.
तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि पिन कोड भरावं लागेल.
आधार कार्ड नंबर टाका आणि Verify वर क्लिक करा. त्यानंतर व्हेरिफिकेशन पास झाल्याचा संदेश दिसेल.
बँकेचा IFSC कोड आणि खात्याचा तपशील भरून Create User क्लिक करा.
राज्य आणि योजना (प्रधानमंत्री फसल बिमा योजना) निवडा. त्यानंतर तुमचं पीक आणि पेरणीची तारीख भरावं लागेल.
तुमचं क्षेत्र आधीच विमित आहे का, ते तपासून, त्यानुसार विम्याची रक्कम भरावी लागेल. त्यानंतर विमा हप्त्याचा तपशील दिसेल.
बँक पासबुक, सातबारा उतारा, ८ अ उतारा आणि पीक पेऱ्याचं घोषणापत्र यांचे फोटो अपलोड करा.
सर्व माहिती तपासून Submit करा. तुमच्या मोबाईलवर अर्ज क्रमांक आणि विम्याची रक्कम येईल.
डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, यूपीआय किंवा QR कोड वापरून पेमेंट करा.
पेमेंट झाल्यावर अर्जाची पावती डाउनलोड करण्यासाठी Print Policy Receipt पर्यायावर क्लिक करा.