नागपूर वृत्तसंस्था
आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात होत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज नागपुरात दाखल झाले आणि नागपूर मध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या . भारतीय जनता पार्टी व नागरिकांच्या वतीने भव्य अशी मुख्यमंत्र्यांची विजयी रॅली काढण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आपल्या शुभचिंतकांचा व कार्यकर्त्यांचा अभिनंदनचा स्वीकार केला. आज संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री राज्यपालांच्या उपस्थितीत नवीन मंत्रिमंडळ सदस्यांचा शपथविधी करण्यात येणार आहे. नवीन मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षान काही नवीन चेहऱ्याला संधी दिली आली आहे तर शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आले. नितेश राणे या तरुण चेहऱ्याला यावेळी भारतीय जनता पक्षाने संधी दिली आहे तसेच गेले अनेक वर्ष दूर असलेल्या पंकजा मुंडे यांना सुद्धा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 40 मंत्री शपथ घेणार आहेत.
महायुतीची संपूर्ण यादी
भाजप
1. नितेश राणे
2. शिवेंद्रराजे भोसले
3. चंद्रकांत पाटील
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा
6. गिरीश महाजन
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे
13. जयकुमार गोरे
14. माधुरी मिसाळ
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार
शिवसेना
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट
राष्ट्रवादी
1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्तमामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक
8 . धनंजय मुंडे